ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत मार्गदर्शक ठरावे : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहराचे नाव स्वामी समर्थांमुळे जगभर गेले आहे. या पुढच्या काळात हे शहर स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत देखील मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली.

अक्कलकोट येथील शरण मठात सिद्धारूढ अभ्यासिका, देवरदासमय ग्रंथालय आणि सीआरएस अकॅडमी व युवा प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जलदिनानिमित्त जलपूजन आणि ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की,ग्रामीण भागात एमपीएससी, यूपीएससी परीक्षा संदर्भात फारशी जनजागृती नाही त्यामुळे ही मुले मागे राहतात आणि काही जणांची इच्छा असते पण त्यांना त्याची तयारी मोठ्या शहरात जाऊन करणे शक्य होत नाही किंबहुना त्यांची आर्थिक परिस्थिती नसते अशावेळी अक्कलकोट येथील शरण मठ ट्रस्ट आणि ड्रीम फाउंडेशनने उचललेले पाऊल निश्चितच चांगले आहे,यासाठी लागेल ते सहकार्य आपण करू.विद्यार्थ्यांनीही या परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी म्हणाले, ग्रामीण भागातील मुले ही खूप हुशार आहेत फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते ते मार्गदर्शन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मिळेल, यासाठीच आम्ही हे केंद्र सुरु करत आहोत, त्याचा लाभ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा,असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी केले. स्पर्धा परीक्षा, संदर्भ ग्रंथ व अभ्यासिका ही श्री रेवणसिद्ध शिवशरण मठ ट्रस्ट आणि ड्रीम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालणार आहे.यातून अनेक विद्यार्थ्यांची सोय होईल,असे भतगुणकी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी, वटवृक्ष देवस्थानचे
अध्यक्ष महेश इंगळे, प्राचार्य नागनाथ जेऊरे,भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन,ट्रस्टचे अध्यक्ष माणिक निलगार,शिवकुमार कापसे,मलप्पा निरोळी, किशोर गिरवलकर, शशिकांत लिंबीतोटे, सुनंदा अष्टगी, संगिता कडगंची, संगीता पाटील, बसवराज आळंद, शिवानंद गोगाव, चौडप्पा भैरामडगी, सतीश पाटील, अजय निरोळी, नीलकंठ बॅगेहळळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बसवराज आळंद यांनी केले. तर आभार संगीता पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!