---Advertisement---

तळागाळातील जनतेसाठी काँग्रेसच्या माध्यमातुन काम करणार – माने देशमुख

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२२ : काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.समाजाच्या उन्नतीसाठी या पक्षाचे योगदान देशाच्या हिताचे राहिले आहे.सर्वधर्मसमभावाच्या भावनेतुन झटणारा हा पक्ष आहे म्हणूनच मी या पक्षाच्या माध्यमातुन तळागाळातील जनतेसाठी काम करण्याचे ठरविले आहे,असे जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.

मागील आठवड्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सोमवारी गणेश माने देशमुख यांचे सोलापूरातील काँग्रेस कार्यालयात प्रथमच आगमन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पक्षात प्रवेश केल्यानंतर शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मुस्तीचे भीमाशंकर जमादार, हबीब नदाफ, अर्जून पाटील, अशोक कलशेट्टी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना गणेश माने देशमुख म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,आमदार प्रणिती शिंदे हे अनेक वर्षांपासून पक्षासाठी अविरतपणे काम करत आहेत.म्हणूनच यापुढील काळात मी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.जिल्ह्यातील युवकांना संघटित करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे माने देशमुख यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!