ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विदर्भातील बड्या नेत्यासह अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था

राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडी घडताय. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या नेत्यांच्या काँग्रेस हायकमांडसोबत बैठका पार पडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका पार पडत असताना काँग्रेस पक्षात अनेक जणांनी प्रवेश केला आहे.

माजी आमदार कपिल पाटील यांनी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे. माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले. एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही. छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले, असं किशोर कन्हेरे म्हणाले.

किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मध्यंतरी त्यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले. शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन किशोर कन्हेरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे. माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!