ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील कॉंग्रेसचा गट भाजपात जाणार ? चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील चार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यात निकालात चार पैकी तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवीले असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम राजकारणावर होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या या विजयामुळे महाराष्ट काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे हा एक मोठा आमदारांचा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेसची सात ते आठ मते फुटली होती. अर्थात, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून राज्यातील सरकारच पाडल्यामुळे त्याकडे फारसे कुणीचे लक्ष गेले नाही. मात्र काँग्रेसने याची चौकशी करण्यासाठी मोहन प्रकाश यांच्या नेतृत्त्वात एक समिती देखील नेमली होती. त्याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आला होता. यात दोषी अमादारांची नावे देखील होती. मात्र, आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत केंद्रातील नेतृत्वाने अद्यापही दाखवलेली नाही. आता तीन राज्यांतील दमदार विजयानंतर त्या आमदारांसह आणखी काही मोठे नेते हे भाजपच्या गळाला लागणार असल्याची भीती काँग्रेसच्याच गोटातून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!