---Advertisement---

महामार्गावर भीषण अपघातात एक ठार तर एक जखमी !

By team
On: December 4, 2023 10:36 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

करमाळा-नगर महामार्गावर मांगीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. दि.३ डिसेंबर सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मांगी येथील वीज उपकेंद्राजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील ठार झालेली व जखमी झालेली व्यक्ती कामोणे येथील आहेत. ते मोटारसायकलवर कामोणेकडे येत असताना त्यांना समोरुन आलेल्या टेम्पोने धडक दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील एकजण ठार झाला तर एकाला बार्शी येथे पाठवण्यात आले असल्याचे समजते. संतोष काशीनाथ देवमुंडे (वय ४२) असे ठार झालेल्याचे तर अश्रु ज्योतीबा देवमुंडे (वय ६०) असे जखमीचे नाव आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपअधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठोसर, बापू घरबुडवे, सागर पुराणिक यांच्यासह कामोणे, जातेगाव व मांगी येथील नागरिकांनी मदत केली. सालसे येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा अपघात झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!