ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसने कधीही जाती-धर्माच्या नावावर राजकारण केले नाही

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची सलगर येथे सभा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

केंद्रात दहा वर्षापासून सत्ता असूनही सोलापूरचा विकास होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे यावेळी मात्र सोलापूरचा लोकप्रतिनिधी निवडताना चूक करू नका. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.काँग्रेसने कधीही जातीच्या किंवा धर्माच्या नावावर राजकारण केले नाही. सर्वधर्म समभाव कायम जोपासला.सर्वच पातळ्यावर अपयशी ठरलेल्या केंद्रातील मोदी सरकारला यावेळी सत्तेवरून खाली खेचा, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, देशात दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देतो म्हणाले,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करतो म्हणाले आणि याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणतात निवडणूक आली की आश्वासन द्यावी लागतात हा काय प्रकार आहे नेमका.देशात खोटे बोलून निवडणुका जिंकून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी टीका त्यांनी यावेळी केली.मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री म्हेत्रे यांनी केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या व खोट्या आश्वासनाचा भांडाफोड करत सत्य उदाहरण देत जनतेच्या मनावर प्रकाश टाकला.काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी देशात आणि राज्यात चाललेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी अतिशय योग्य उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी सलगरकरवासीयांनी उभे राहावे.जिल्ह्यात एक अभ्यासपूर्ण नेतृत्व म्ह्णून आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.त्यांना यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे,असे आवाहन केले.या सभेत काँग्रेसचे कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी,जेष्ठ नेते मल्लीकार्जुन पाटील यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी मंडळी कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत आणि ते जनतेवर कशा पद्धतीने अन्याय करत आहेत याचा पाढाच वाचला. त्यासाठी परिवर्तन खूप गरजेचे आहे जनतेने यावेळी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जेष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे,शरदचंद्र पवार गटाचे बंदेनवाज कोरबु, सरपंच ज्योती डोगंराजे,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शितल म्हेत्रे, मनोज यलगुलवार,उपसरपंच काशिनाथ कुंभार,माया जाधव,सुरेखा पाटील, माजी सरपंच सुरेखा गुडंरगी,आनंद सोनकांबळे,शिवानंद बिराजदार,बाबा पाटील, सातलिंग गुडंरगी,प्रविण शटगार, संजय डोंगराजे,इक्बाल बिराजदार,इरणा धसाडे,अर्जुन जमादार,गुरूनाथ कालीबत्ते,रफिक पटेल,रमेश डोंगराजे आदिंसह सलगर व पंचक्रोशीतील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महागाई कमी झाली का ?
खोटे बोलून देशाचा विकास होत नाही. दहा वर्ष आधी भाजपने आम्ही महागाई कमी करू, आम्ही हे करू ,आम्ही ते करू अशा प्रकारची मोठी मोठी आश्वासने दिली आणि सत्तेवर आले.आज ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे भाजपने मते मागण्याच्या आधी याची उत्तरे जनतेला दिले पाहिजे.
– प्रणिती शिंदे,आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!