मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भुसावळ – राजेश मानवटकर
जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गंगाणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामटी – सुरेश भोयार
भंडारा – पुजा तवेकर
अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुळकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरेखड – साहेबराव कामंबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद ईस्ट – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली ईस्ट – कालू भडेलिया
चारकोप – यशवंत सिंह
सायन कोळीवाडा – गणेशकुमार यादव
श्रीरामपुर – हेमंत ओघले
निलंगा – अभयकुमार साळुंके
शिरोळ – गणपतराव पाटील
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर दक्षिण मधून गिरीश पांडव, सावनेर मधून अनुजा सुनील केदार आणि कामठी मधून सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली. नागपूर दक्षिण च्या जागेवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आग्रही होती. अखेर मविआ मध्ये दक्षिण नागपूर काँग्रेससाठी सुटली आहे. तर सावनेर मधून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना पुढील निवडणूक लढता येत नसल्याने पत्नी अनुजा केदार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.