---Advertisement---

कॉंग्रेसला बसणार आणखी मोठा धक्का : आमदाराने घेतली भाजप नेत्याची भेट !

By team
On: September 13, 2024 9:38 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  वृत्तसंस्था

आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपापली तयारी देखील सुरू केली आहे. त्यातच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. त्यातच आता काँग्रेसला भाजप आणखी एक धक्का देणार असल्याचे समोर आले आहे. नांदेड दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे काही दिवसांपूर्वीच देगलूर चे आमदार जितेश अंतापुरकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मोहन हंबर्डे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप देखील करण्यात येत होता. त्यामुळेच आमदार हंबर्डे हे भाजपच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा सध्या नांदेडमध्ये सुरू झाली आहे. त्यातच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

आपापल्या मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या पक्षांतराचा सध्या पॅटर्न पाहायला मिळत आहे. शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त असली तरी भारतीय जनता पक्षात देखील काही इच्छुक प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात नांदेड मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यापासून इतरही आमदार भाजपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आधी अंतापुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता हंबर्डे हे देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!