अक्कलकोट, दि.१ : मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी बुधवारी व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितल्यानंतर गुरुवारपासून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शिवछत्रपती शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांची तपासणी करण्यात आली.यात ६२ जणांपैकी एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे.टप्प्याटप्प्याने सर्वच गाळेधारक, फेरीवाले, व्यापारी तसेच नोकरांची रॅपिड एंटीजन टेस्ट केली जाणार आहे.उद्या जुना अडत बाजार परिसरातील व्यापाऱ्यांची टेस्टिंग होणार आहे, अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे. पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली असून व्यापारी या मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविल्यानंतर तात्काळ व्यापाऱ्यांनी टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. अक्कलकोट शहर हे मोठे आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतःहून टेस्टिंग साठी पुढे यावे जितके ट्रेसिंग होतील तितके चित्र समोर येईल जर टेस्टिंग नाही झाले तर मात्र कोरोना रुग्ण हे वाढत जातील. त्यामुळे टेस्टिंग वाढणे गरजेचे आहे.यासाठीच मुख्याधिकारी
सचिन पाटील यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाकडून तात्काळ हे काम गतीने सुरू करण्यात आले आहे.याला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे,असे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.