---Advertisement---

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या १२वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

यंदा १२वीची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एप्रिल-मे २०२१ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ३ एप्रिल २०२१ पासून कॉलेज लॉगईनमध्ये डाऊनलडोड करण्याकरिता उपलब्ध होतील.

या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!