पालिका घेणार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०० टॅब, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होण्यास होणार मदत
मुंबई : पालिका दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच तब्बल १९ हजार ४०० टॅबटॅ खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे ३९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात प्रत्येक टॅबटॅसाठी २० हजार ५३२ रुपयांचा खर्च येणार आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.
या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्येही विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी पालिकेने २०२१-२२ या वर्षात दहावीच्या सर्व चार माध्यमातील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला होता. या नुसार आता टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. या टॅबमध्ये मराठीसह उर्दू, र्हिंदी, इंग्रजी या चार भाषांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.
याला बालभारतीची मान्यता ही घेण्यात येईल. या प्रत्येक टॅबसाठी महानगर पालिका करासह २० हजार ५३२ रुपयांचा खर्च करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही संबंधित पुरवठादारावर सोपविण्यात येणार आहे.