दिल्ली : एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्याची माहिती समोर आली असून सायबर चोरांनी यातून प्रवाशांशी संबंधित महत्वाचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे ४५ लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एयर इंडियाने एका प्रसिद्धी पत्रकातून याची माहिती दिली आहे. जगभरातील सुमारे ४५ लाख डेटा सब्जेक्टला याचा फटका बसण्याची शक्यता एअर इंडियाने वर्तविली आहे.
एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. सर्व्हर सुरक्षित करण्यात आला आहे. तसंच एयर इंडिया एफएफपी प्रोग्रामचे पासवर्ड सुद्धा रीसेट करण्यात आले आहेत.त्या बरोबर पासवर्ड बदलण्याचा आवाहन एयर इंडियाकडून करण्यात आले आहे.