ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिला अधिकाऱ्यांवर दादांची ‘दादागिरी’ ; अखेर अजित पवारांनी मौन सोडले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत अजित पवार यांनी दादागिरीची भाषा महिला पोलीस अधिकाऱ्याला केल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करणं नव्हता, तर घटनास्थळी परिस्थिती शांत ठेवणं आणि ती आणखी चिघळू नये याची काळजी घेणं हा होता.

पुढे म्हणाले की, आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायेदशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय, मी सांगतोय ते बेकायदेशीर काम कर असे ते सांगताहेत. आणि हेच अजित पवार इतरांना कायदा शिकवात, मग तुम्ही काय करता? असा खडा सवाल राऊतांनी अजित पवारांना विचारला आहे.

तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात अशी जहरी टाकाही राऊतांनी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलं आहे, महाराष्ट्राच्या उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असा घणाघातही राऊतांनी केला आहे.

धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अंजली दमानिया

करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? असे प्रश्न दमानिया यांनी अजित पवारांना विचारले आहेत. “तुझे डेरिंग कसे झाले…. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!