---Advertisement---

मध्यरात्री खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !

By team
On: October 12, 2025 5:10 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी दांडके, कोयते आणि कुऱ्हाडीचा वापर करून महिलांवर थेट डोक्यावर, पाठीवर आणि पायांवर वार केले.

ही भयानक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. महिलांनी मदतीसाठी ओरडल्या, किंकाळ्या फोडल्या, तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. जखमींनी रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हल्लेखोरांनी “अनेकदा सांगितले तरी या ठिकाणी का राहता?” असे म्हणत मारहाण केली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!