---Advertisement---

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, बिहारमधून एकाला घेतले ताब्यात

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे.

सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ. डी. बी. मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्तुत प्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलीस या व्यक्तीला मुंबईत आणत आहेत. त्यांनतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!