ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देगाव एक्सप्रेस योजना पूर्ण करण्यासाठी महायुतीला साथ द्या !

वळसंग येथील सभेत आमदार कल्याणशेट्टी यांचे आवाहन

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

एकरूख उपसा सिंचन योजना मार्गी लागून एका भागाचा उजनीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता देगाव एक्सप्रेस कॅनॉलच्या माध्यमातून दक्षिण भागातील शेतकऱ्यांचा जलसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी आणि शाश्वत स्वरूपात मिटेल. यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वळसंग येथे भाजप महायुतीच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी ते म्हणाले की, देगाव जोड कालवा एक्सप्रेस सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. देगाव कालवा आणि देगाव उपसा सिंचन योजना ही उजनीच्या डाव्या कालव्यावरील कारंबा शाखाच्या ५३ किलोमीटरवरून ही शाखा निघते. या कालव्याची एकूण लांबी हे २८ किलोमीटर असून प्रकल्पातील जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाला ३५० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण सोलापूर मधील दहा गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील पंचवीस गावांना याचा लाभ होणार असून बेचाळीस हजार पाचशे एकर जमीन सिंचना खाली येणार  आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

 

गेल्या पाच वर्षात या गावात रमाई नगर येथे रस्ता करणे, भिम नगर येथील ऐतिहासिक विहीरीजवळ (संरक्षक भिंत) बांधणे, मातंग समाज वस्ती येथे समाजमंदिर बांधणे, सिध्देश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे, मातंग समाज सभागृह बांधणे, यासिनसाब दर्गा संरक्षक भिंत बांधणे, एस.टी. स्टॅन्ड ते मारूती मंदिरापर्यत सिमेंट रस्ता व गटार करणे, भिम नगर येथील ऐतिहासिक विहीरीकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता करणे, चौडेश्वरी मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, श्री. मल्लिकार्जुन शिवानंद अंटद यांचा वैद्यकीय उपचार, तिलाटी गेट ते वळसंग रस्ता, वळसंग-तिर्थ मार्गे चप्पळगांव रस्ता, वळसंग ते हालचिंचोळी रस्ता सुधारणा करणे, हालचिंचोळी ते वळसंग ग्रा. मां. २५ मध्ये सुधारणा करणे ही विकासकामे पूर्ण झाली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

 

यावेळी शहाजी पवार, आनंद चंदनशिवे,  दिलीप सिध्दे, अविनाश मडीखांबे, मलकप्पा कोडले,  श्रीशैल दुधनी,  महेश बिराजदार,  अनिल बर्वे, पंडित कोरे,  शिवराज स्वामी,  महेश हिंडोळे, दगडू मुगळे,  महेश खैराटे,   यासीन कटरे,  विश्रांती पाटील, सिद्धू टिपरादी,  सागर कोळी,  रायप्पा पुजारी आदिंसह महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!