हन्नूर रोडवरील बायपास उड्डाण पुलाजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी, आतापर्यंत दोघांचे बळी, प्रशासनाला जाग कधी येणार ?
मारुती बावडे
अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट या मार्गावर सद्या चालू असलेल्या हन्नूर रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जवळ सिग्नल आणि गतिरोधक बसवण्यात यावे आणि होणारे अपघात टाळण्यात यावेत अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. या चौकात आता पर्यंत दोघांचे बळी गेले आहेत आणि चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अजून किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासन याचा विचार करणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम करणाऱ्या जिआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे शिवसेनेचे अक्कलकोट शहरप्रमुख योगेश पवार यांनी केली आहे. सोलापूर ते अक्कलकोट बायपास रोड बनविण्याचे काम सद्या प्रगतीपथावर असून रोड मोठे आणि प्रशस्त झाल्यामुळे जड वाहतूक करणारी वाहने व इतर चारचाकी वाहने बेफामपणे वाहने चालवीत आहेत. वेगमर्यादा न पाळता बेफामपणे वाहने पळविली जात आहेत यामुळे अक्कलकोट बायपास जवळ होणाऱ्या चपळगाव रस्त्यावर रोजच दुचाकी वाहनांना मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे आणि यात दुचाकीस्वारांचे नाहक जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे तात्काळ चपळगाव – हन्नूर रस्त्यावर होणाऱ्या उड्डाण पुलाजवळ गतिरोधक व सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावे,अशी मागणी जोर धरत आहे.
जड वाहतुकीची वाहने येथून बेफाम जात असल्याने काल नाहक या बेफाम वाहतुकीचा फटका चपळगाव येथील मोटारसायकल स्वाराला बसला आणि जड वाहतुकीच्यावाहनाने त्या मोटारसायकल स्वाराला उडविल्यामुळे त्याचा नाहक जीव गेला आहे.त्यामुळे तात्काळ येथे सिग्नल यंत्रणा सुरू करावी आणि गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
- हन्नूर रोडवर अपघातांची मालिका
या रोडवर गतीरोधक नसल्याने हा चौक अपघातांचा अड्डा बनला आहे.याकडे आता लक्ष देणार.रोज काहींना काही घडत आहे.याबाबत कंपनी गांभीर्याने पाहायला तयार नाही.प्रशासन मूग गिळून गप्प आहे.त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त
होत आहे.