सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील पुणे शहरात “निर्भय बनो’ सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक, लाठीहल्ला, शाईफेक, अंडीफेक केली. वागळे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत सोलापुरात निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ पीजी ग्रुप यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर हातात काळा झेंडा घेऊन काळया फिती लावून निदर्शने करण्यात आली.
यावेळी शहर युवक अध्यक्ष योगेश कांबळे, सोलापूर शहर प्रवक्ता अतिश मेत्रे, हद्दवाड अध्यक्ष उमेश जेटीठोर, शहर सरचिटणीस कोमल माचले, अल्पसंख्यांक अध्यक्ष फारुख शेख, संजय कुचेकर, श्रीकांत नारायणकर, मोहसीन पुढारी, शापिक शेख, हब्बू शेख, अंबाजी शिंगे, पपन मस्के, विशाल लालसरे, रोहित मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. जर राज्यामध्ये तुम्हाला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही तर अशा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी केली.