सोलापूर, दि. 02 : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 03 व 04 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरुवार दि. 03 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 5.00 वा. मुंबईहून सोलापूर विमानतळ येथे आगमन. 5.35 वा. सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मल्हार पेठ- पंढरपूर येथे आगमन. 5.40 वा. मोटारीने पंत चौक, कोर्टी, पंढरपूरकडे प्रयाण. 5.45 वा. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील कोर्टी ते वाखरी (बाह्य वळण) रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 6.00 वा. शासकीय विश्रामगृह प्रांगण, पंढरपूर येथे आगमन व वारकरी दिंडीसाठी राखीव. सायंकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर विकास आराखडा बाबत बैठक.रात्रौ- मुक्काम.
शुक्रवार, दि, 04 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 2.20 वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर- शासकीय महापूजा व समारंभास उपस्थिती. पहाटे 4.50 वा. श्री संत नामदेव महाराज जयंती निमित्त दर्शन. (स्थळ- संत नामदेव महाराज वाडा) पहाटे 5.05 वा. शासकीय विश्रामगृह येथे संत नामदेव महाराजांच्या 752 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेचा शुभारंभ. सकाळी 11.15 वा. बार्शी चौफुली येथे आगमन व काव्यतीर्थ आचार्य वेदान्तवाचस्पति पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या मूर्तीचे अनावरण.
दुपारी 12.15 वा. पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि.नंदूर,मंगळवेढा येथे आगमन. 12.30 वा. आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदुर या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.40 वा. हेलिकॉप्टरने बार्शी कडे प्रयाण. 2.10 वा. शिवशक्ती मैदान, बार्शी येथे आगमन. 2.15 वा. डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल, बार्शी यांचे सेंट्रल आय. सी. यू. ॲण्ड ट्रॉमा सेंटरला भेट. 2.35 वा. श्री. दिलीप गांधी यांच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योग प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा समारंभास उपस्थिती. 3.05 वा. श्री भगवंत मंदिर येथे दर्शनासाठी राखीव. 3.20 वा. विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- जुना महात्मा गांधी पुतळा, बार्शी) 4.30 वा. हेलिकॉप्टरने शिवशक्ती मैदान, बार्शी येथून पुणेकडे प्रयाण.