मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसावर येवून ठेपल्या असतांना महायुतीमध्ये देखील वादाची ठिणगी पडली असून याबाबत राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला पोहोचले. ते सकाळी पुन्हा परत आले. त्यांनी अमित शहा यांच्याशी महायुतीतील वादासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील दोन नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. तर मुंबईत देखील नवाब मलिक यांच्यावर आरोप करून देखील ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत दाखल झाले आहेत. इतकच नाही तर त्यांच्या मुलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी देखील दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. नवाब मलिक हे जेलमधून परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविषयी अजित पवार यांना पत्र लिहिले होते. आम्ही राष्ट्रप्रेमी असून राष्ट्रद्रोही व्यक्ती महायुतीमध्ये नको, अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती.
मात्र, तरी देखील नवाब मलिक यांना अजित पवार यांनी जवळ केले आहे. अजित पवार यांच्या जनन्समान यात्रेदरम्यान नवाब मलिक यांचा प्रचार प्रकर्षाने जाणवला. इतकेच नाही तर त्यांच्या कण्येला देखील अजित पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर दिलेल्या फडणवीस त्यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे