---Advertisement---

सांगवी बु ग्रामपंचायत आदर्श पुरस्काराने सन्मानित

By team
On: August 20, 2024 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळाला आहे. याचे वितरण आमदार समाधान आवताडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.हा पुरस्कार सरपंच वर्षा भोसले, ग्रामसेवक शैलजा पोमाजी,मेजर बाळासाहेब भोसले यांनी स्वीकारला.हा कार्यक्रम पंढरपूर येथे पार पडला.

यावेळी डॉ.रामनाथ जऱ्हाड,अबूबकर शेख,उपसरपंच तहसीन शेख, ग्रा पं सदस्य वासंती सलबत्ते,काजल राठोड,सुभाष सोनकांबळे, नबीलाल शेख, मुन्ना शेख, इरफान शेख, प्रदीप सलबत्ते, रवी राठोड, जिलानी शेख, जैनुद्दीन पठाण, शुभम जाधव, अभिजित माने, मौला चाबुकस्वार, अनिल राठोड, शशिकांत राठोड, लखन आवटे , बळवंत भोसले, सुरज भोसले, वालचंद सोनकांबळे, यश येकुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.गावामध्ये चांगले सिमेंट काँक्रीट रस्ते,आरोग्य उपकेंद्र, बंदिस्त गटार,शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण, गावात पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर,वृक्ष लागवड,घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन,दलित वस्तीत सुधारणा यासारखे अनेक कामे केल्याने हा पुरस्कार मिळाला असल्याचे सरपंच वर्षा भोसले यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!