सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी दिलासा देणारा दावा देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, सोलापूर येथे मंजूर झालेले मिलेट सेंटर दुसरीकडे जाणार नाही. तसेच जीआर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. एकवेळ बारामतीचे रद्द करून सोलापूरचे करू असे देखील अजित पवारांनी सांगितले. मराठा आरक्षणा संदर्भात सरकार काम करत आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सोलापूरला पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दुहेरी जलवाहीनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.