मुंबई , वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्याप्रकरणानंतर संतापाची लाट पसरली असून राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. यातच सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्यांचे संबंध या प्रकरणात आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंड्याचं राज्य हे मी चालु देणार नाही, कोणालाही पैसे, खंडणी मागता येणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याला शरणागती पत्करावी लागली आहे. जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागलेल्या आहे आणि कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवरुन चर्चा झाली आहे त्यांनाही मी आशवस्त केलेलं आहे काळजी करुन नका. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून जो पर्यंत ते फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील हे आश्वासन मी दिलं आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर संयशित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर कोणती कारवाई होईल ते पोलिस तपास करुन ठरवतील आणि जे जे पुरावे आहे त्याच्या आधारावर कोणालाही सोडलं जाणार नाही. आम्ही जाणीव पुर्वक केस CID ला दिली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. तर यावेळी त्यांनी विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिला. कोणीही काही म्हणत असलं तरी पोलीस पुराव्याच्या आधारानुसार कारवाई करतील त्यामुळे विरोधक काय बोलतायत हा विषयच नाही.कोणाकडे पुरावे असतील त्यांनी द्या माझ्या करिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभुत लोकांचा शिक्षा होणं महत्त्वाच आहे ,काही लोकांना राजकारण महत्वाच आहे त्यांच राजकारण त्यांना लखलाभ त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही काय फायदा होईल मात्र आमची भुमिका स्पष्ट आहे. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.