देवेंद्र फडणवीसांनी खरं काय ते लोकांना सांगितले नाही !
आमदार कल्याणशेट्टींच्या आरोपाला म्हेत्रेंचे प्रत्युत्तर
अक्कलकोट : प्रतिनिधी
भाजपने नुकत्याच झालेल्या मेळाव्यात आम्ही पक्षप्रवेशासाठी येरझाऱ्यां घालत होतो अशी टीका केली. परंतु आम्हाला फोन कोणी केला आणि कशासाठी ते फोन करत होते आणि मुंबईला कोण बोलावीत होते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात का सांगितले नाही. खोटे बोलून लोकांची दिशाभूल करणे बंद करा, असा आरोप माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला.मैंदर्गी ( ता.अक्कलकोट ) येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून एकरूख उपसा सिंचन योजनेची वचनपूर्ती व स्वप्नपूर्ती केल्याबद्दल म्हेत्रे यांचा सत्कार आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते. ज्यावेळी कुरनुर धरणा संदर्भातील आठ एकर स्लॅबचा विषय मार्गी लावला त्यावेळी तालुक्यात सगळ्यात आधी मैंदर्गीवासीयांनी माझा सत्कार केला आज देखील उजनीचे पाणी आणल्यानंतर सगळ्यात आधी नागरी सत्कार त्यांनीच केला, याचा आवर्जून उल्लेख म्हेत्रे यांनी आपल्या भाषणातून केला.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,आमदार कल्याणशेट्टींनी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येरझार घालत होतो असे म्हटले.परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे पाणी मिळवून देणे हे माझे कर्तव्य होते.ही माझी मजबुरी ओळखुन मध्यंतरीच्या काळात सोलापूर बाजार समिती,जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानपरिषद निवडणुकीत माझा वापर भाजपावाल्यांनी करुन घेतला.याउलट फडणवीसांनीच मला वारंवार फोन लावून मुंबईला बोलावल्याचे म्हेत्रेंनी स्पष्ट केले. विकास कामे करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. परंतु ज्यांनी कामे केले त्यांना श्रेय देणे यात मनाचा मोठेपणा दाखवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत,असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे राज्य उपनेते शरद कोळी,तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे आनंद बुक्कानुवरे, व्यंकट मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज गोब्बुर होते. व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,सिध्दाराम भंडारकवठे,दत्तात्रय डोंगरे,काशिनाथ जकापुरे,सुरेश दिवटे, उमरशा मकानदार,राजशेखर हिरतोट, नागण्णा दुर्गी,निलकंठ मेंथे,चॉंद आळंद,मल्लिनाथ आरवतकल,राम जाधव, इमाम बागवान, विलास सावळी ,महंमद नाईकवाडी, रजाक मकानदार, समीर मकानदार,बसवराज हुळळी, देवराज जकापुरे, फकीरप्पा काळी, संजीव सवळी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज हिरतोट यांनी केले.सुत्रसंचालन कल्याणी करडे यांनी केले.यावेळी मैंदर्गी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल मीडियावर जाहिरातबाजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे काही मीच केले आहे.असे म्हणत सोशल मिडीयावर सक्रिय असतात.अगदी तसाच प्रकार तालुक्यात सुरू आहे जाहिरातबाजी,सोशल मिडीयावर जनतेला भुरळ पाडत आहेत. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे सुरू आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल करा,असे आवाहन म्हेत्रे यांनी केले.