---Advertisement---

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

Follow Us:
---Advertisement---

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्र

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गृह खाता कोणाकडे जाणार? याकडे राज्यातील जनतेचा लक्ष लागला होता. यावर सध्या पडदा पडला आहे.अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री पदाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आली आहे.तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे कामगार विभागाची जवाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दलचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा,असेही या पत्रात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!