सोलापूर दि.०८ मार्च : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला.त्यावर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, तरुणांची आणि सामान्यांची पूर्ण निराशा झाली आहे. ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फसवा आहे.
घरगुती वीज ग्राहकांना १०० युनिट पर्यंत वीज बिल माफ केले नाही.शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कोणताही निधी देण्यात आला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.ठाकरे सरकारची ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी ठरलेली आहे.
इंधन दरवाढी संदर्भात राज्य सरकारवर टीका करताना देेशमुख म्हणाले की,राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर 27कर घेण्यात येतात, त्यातील एक पैसाही सरकारने कमी केला नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, सामन्यांची, तरुणांची निराशा झालेली आहे,