---Advertisement---

मैंदर्गीत शावरी युथ फौंडेशन तर्फे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

Follow Us:
---Advertisement---

गुरुशांत माशाळ

दुधनी, दि.९: अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील महेश शावरी युथ फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आला. यावेळी सर्व स्तरावरील सामाजिक योगदान देणाऱ्या व यशस्वी महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. (मैंदर्गी) वेदमूर्ती परमपूज्य सोमशेखरय्या सालीमठ यांच्या दिव्यसानिध्यात सुरेखा होळीकट्टी यांच्या अध्यक्षत्याखाली हा कार्यक्रम पार पडला.

जागतिक महिला दिना निमित्त ७ मार्च रोजी शहरातील महिलांसाठी संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भागीरथी बरमा, कमलाबाई हुळ्ळी, बसम्मा गोब्बूर, सुरेखा गोब्बूर, रेवबाई धनगर, सुभद्रा बंडे, योगीराज बाजारमठ, फजलेरहमान शाब्दि, शिवशंकर आलमेल, नागनाथ दुर्गी, राजशेखर मसुती, दिलीप शावरी, मंजुरसाब लुकडे, ज्योतिबा चव्हाण, धानप्पा हसरमनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शावरी युथ फौंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम निंबाळ यांनी केले. आभार बाबू बाजारमठ यांनी मानले.

◆ यांचा करण्यात आला सत्कार

स्मिता नागणसूर, पार्वती नागठाण, मालन शेख, शांताबाई कौलगी, प्रभावती वच्चे, पार्वती कोरचगाव, सुरेखा दिवटे, समीना लुकडे, श्वेता धुमाळ यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!