ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनियमित विजपुरवठयाबाबत वागदरी मतदार संघात नाराजी ; शेतकरी ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जि.प मतदारसंघातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी अनियमित आणि अपुरा विजपुरवठा होत असल्याने प्रचंड नुकसानीला व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत आता माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. मागील तीन वर्षांपासून भुरीकवठा येथे मंजुर झालेल्या नवीन ३३ केव्ही सबस्टेशनचे काम संथगतीने सुरू आहे.ठेकेदार व प्रशासन शेतकऱ्यांना अर्धवट,चुकीची आणि वस्तुस्थितीला विसंगत माहिती देत आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सब स्टेशनचे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन सबस्टेशनचे काम दिलेल्या वेळेत पुर्ण न झाल्यास अक्कलकोट महावितरण कार्यालयासमोर ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोमवार बाजार दिवशी वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, आजी, माजी सरपंच व सर्व शेतकरी बांधवांसहित ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन अधिक्षक अभियंता सोलापुर ग्रामीण यांना तानवडे यांनी दिले आहे.

कार्यकारी अभियंता एस.आर शिंदे यांनी हे निवेदन स्विकारले. याचे निवेदन उपअभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी अधिक्षक अभियंता अरुण थोरात, अॅड अमितकुमार कोथमिरे यांच्यासह उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!