---Advertisement---

कन्नड रक्षण संघटनेचा झेंडा लावल्याने वाद ; मराठी भाषिकांनी घेतली आक्रमक भूमिका

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापुर : बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण संघटनेचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील मराठी भाषिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या वादग्रस्त झेंडा हटवण्याची मागणी करत मराठी भाषिकांनी महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी कोल्हापूर मधील शिवसैनिक बेळगावमध्ये जाणार आहेत.

मराठी भाषिकांच्या या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कर्नाटक पोलिसांनी बेळगावमध्ये बंदी आदेश जारी केला आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगाव मध्ये प्रवेश करू नयेत, यासाठी बेळगाव पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांना बेळगाव पोलिसांकडून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!