अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून ऑक्टोबर महिन्यातील ८० कीटचे वाटप रविवारी करण्यात आले.
तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर,पुणे, सोलापूर,धाराशिव,संभाजीनगर आदि ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते.
गेली ३७ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. अन्नछत्र मंडळात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवे बरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे.
तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ८० पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब पोळ, गोटू माने, प्रवीण घाटगे, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.