मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सुरु असलेल्या लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना अनेक ठिकाणी काही त्रुटी येत असतांना विरोधक सरकारवर आक्रमक टीका करीत असतांना दिसत असतांना नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाल्यामुळे विरोधक या योजनेला खिळ बसावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी काही अर्जांवर गाढव आदींचे चित्र टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वत्र यशस्वी ठरली आहे. काही दलाल या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते चुकीचे फॉर्म भरून या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत विशेषतः महाविकास आघाडीही या योजनेला खिळ बसावी यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी काही अर्जांवर गाढव आदींचे विचित्र फोटो टाकण्यात आलेत. या प्रकरणी संशयाची सूई विरोधी पक्षांतील लोकांवर जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन केलेल्या आरतीचा एवढा मोठा बाऊ करण्याची काहीच गरज नसल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, हा एवढा मोठा विषय नाही. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना टीका करण्याशिवाय दुसरे काही सूचतच नाही. न्यायमूर्ती हे न्यायदानाचे काम करतात. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या घरी आरतीसाठी गेल्यानंतर त्यासंबंधी तर्कवितर्क व्यक्त करणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. विरोधी पक्षातील एखादा नेता सत्तापक्षातील एखाद्या नेत्याच्या घरी गेला असता त्यांनी गळाभेट घेतली असे होत नाही. भेटीचा व कामाचा संबंध जोडता कामा नये.