ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ.रवींद्र बनसोडे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नवे अधिक्षक;ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यावर भर देणार

 

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नवे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ.रवींद्र बनसोडे यांनी पदभार घेतला आहे. अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकारी म्हणून डॉ.अशोक राठोड यांच्याकडे पदभार होता. यामुळे पूर्णवेळ अधिकारी नसल्याने वैद्यकीय सेवेचा खेळखंडोबा होत असल्याची तक्रारही करण्यात होत होती. बनसोडे यांच्या रूपाने आता पूर्ण वेळ अधिकारी मिळाला आहे.डॉ.बनसोडे हे २००८ ते १२ पर्यंत वागदरी आणि शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.२०१२ ते १३ असा एक वर्ष ते ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होते.२०१३ ते १५ साली अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांनी प्रभारी पदाचा चार्ज घेतला होता.२०१५ ते २० या काळामध्ये नागणसूरमध्ये ते वैद्यकीय अधिकारी होते.२०२१ ते २२ जेऊर आणि त्यानंतर पुन्हा अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात ते वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवेत आज पासून रुजू झाले आहेत.डॉ.बनसोडे यांनी २०१५ साली अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदा सिझर अँड सेक्शन सुरू केले आणि त्यांच्या कार्यकाळामध्येच या रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला.या पुढच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, प्रभारी पदामुळे विस्कळीत झालेली आरोग्य सेवा पुरवठा किंवा प्रलंबित ड्रामा केअर सेंटर अक्कलकोटवासियांसाठी लवकरात लवकर सुरू करण्याचा विषय या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपण हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची
ग्वाही डॉ.बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना
दिली.डॉ. बनसोडे यांच्या नियुक्तीबद्दल वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!