---Advertisement---

आ.आव्हाडांनी काढली अजित दादांची ढेरी !

By team
On: December 6, 2023 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवारांच्या व अजित पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना आता या वादात शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून त्यांनी आता थेट अजित पवारांन डिवचले आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीकास्र सोडले होते. जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली होती. यावरच आता आव्हाडांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर केला. ”दादा तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दाखवतो” असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दाखवतो”. अशी मिश्किल टिपण्णी आव्हाड यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!