ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ड्रगमाफिया ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असून आरोपी हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) मधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या तिघांचे बँक ‘डिटेल्स’ मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. तसेच इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचाही तपास करणे बाकी आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवून हवी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे भूषण पाटील याच्यासह तिघांच्या पोलिस कोठडीत २९ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ड्रगमाफिया ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी शुक्रवारी पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ललित पाटीलसह आठ आरोपी पोलिस कोठडीत होते. त्यांची कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना दुपारी विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!