---Advertisement---

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण; राज्यातील इतर शहरांमध्येही सुरु होणार बग्गीची सुविधा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गीचालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेत पाहणी केली. मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळांवर देखील अशी सुविधा सुरु होणे गरजेचे असल्याचे पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!