प्राध्यापक उमेश मोहिते यांच्या भक्तीसंध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
समर्थ नगर विसावा कट्टा तर्फे स्वामी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट समर्थ नगर विसावा कट्टा येथील कार्यक्रमात लातूरच्या प्राध्यापक उमेश मोहिते, सिने पार्श्वगायिका सुनीता मोहिते आणि भजन सम्राट अभिमन्यू मोहिते यांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठी दाद दिली.जेऊर रोडवरील विसावा कट्टा मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कानडा राजा पंढरीचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा,माझे माहेर पंढरी,एक तारी गाते गुरु नाम,स्वामी कृपा कधी करणार ,अबीर गुलाल उधळीत रंग यासारख्या असंख्य भक्ती गीताने रसिक मंत्रमुग्ध होत गायनाला उस्फुर्त अशी दाद दिली.यावेळी प्रथमच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांवरील नवीन ‘धाव रे स्वामी समर्था’ याभक्ती गीताचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रा. सुनिता मोहिते म्हणाल्या श्री स्वामी समर्थांच्या भूमीत पुण्यतिथी निमित्ताने आपल्या स्वरातील गाणे आज रिलीज होत आहे याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे.
या पुढच्या काळात आणखीनही स्वामी महाराजांवरची गाणी आम्ही निश्चितपणाने पुढे आणू.तबल्यावर ओंकार कलशेट्टी,अभिजित इंगळे तर मृदंगावर यश राऊत तर हार्मोनियम आणि गायक म्ह्णून प्रा उमेश मोहिते यांनी साथ दिली.यासाठी ह.भ.प वीरपाक्षप्पा वैरागकर,शिवशरण जोजन,गोपाळराव कोटणीस, श्रीकांतजिड्डीमनी, एम.बी.पाटील, रुद्राक्ष वैरागकर,मलमा पसारे,महेश कुलकर्णी,धुळप्पा बजे,सुधाकर काळे,बाबुराव रामदे,शिवशंकर प्याटी,मोहन चव्हाण,राजू डबरे,बसवराज नालवार,रवी माळी, बालाजी जाधव,शरणाप्पा ढोणसाले,भीमराव साठे,चिदानंद बजे आदींनी सहकार्य केले.