ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधेयक एकमतानं मंजूर तरी देखील जरांगे पाटील उपोषणावर ठाम

जालना : वृत्तसंस्था

मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाइन काढली. आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं. उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाईन काढली. आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं. उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विधानसभेत ‘सगेसोयरे’बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!