नागपूर : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यासह अनेक पदाधिकारी कामाला लागले असून यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अनेक जिल्ह्याचे दौरे करू लागले आहे. त्यांनी एका ठिकाणी नुकतेच भाजपचे नेत्यांना विशेषतः आमदार व खासदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, मी १५ वर्षे आमदार व ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला घरी बसवले होते, हे कायम लक्षात ठेवा, अशी आठवण त्यांनी आपल्या पक्षनेते व कार्यकर्त्यांना करून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपतील इच्छुक चांगलेच हादरलेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय समिती घेते. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. मी 15 वर्षे आमदार व ऊर्जामंत्री म्हणून काम केले. पण त्यानंतरही पक्षाने मला थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे पक्ष कुणालाही केव्हाही उमेदवारी देवू शकतो आणि कुणालाही थांबवू शकतो. या प्रकरणी मी माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर यांनी 40 वर्षांत झाली नाहीत एवढी कामे केली आहेत. ते देशातील टॉप 10 खासदारांच्या यादीतही आहेत. पण भाजपचे धोरण पाहता मी त्यांच्या कामाचे केवळ कौतुक केले आहे, असे बावनकुळे म्हणाले.