ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मंत्री देशमुखांचा पलटवार ; आमदारांना ५० कोटी देवून सरकार…

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन नेत्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना यावर आता शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आता थेट भाजपचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

माजी मंत्री देशमुख म्हणाले कि, चांदीवाल अहवाल महाआघाडीचे सरकार असताना जाहीर करणार होते. मात्र, अहवाल जाहीर होण्यापूर्वी 40 आमदारांना 50 कोटी रुपये देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडले, असा पलटवार त्यांनी यावेळी केला आहे. चांदीवाल अहवालावरून अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना अहवाल सादर झाला होता मग तो जाहीर का केला नाही? असा प्रश्न विचारला होता. यावर आता देशमुख यांनी देखील पलटवार केला आहे.

या संदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओमध्ये स्फोटक ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्या गाडी मालकाची हत्या झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह हे मास्टरमाईंड होते. यांना एनआयए कडून अटक होणार होती. मात्र, परमवीर सिंह आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे परमवीर सिंह हे फडणवीस यांना शरण गेले. आणि या गुन्ह्यात मला अटक करू नका, अशी विनंती केली. त्याचवेळी फडणवीस यांनी माझ्यावर सरकार पाडण्यासाठी परमवीर सिंह यांना आरोप करायला सांगितले. तशी फडणवीस आणि परमवीर सिंह यांच्यात डिल झाली होती. त्यामुळेच परमवीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले होते, असा देखील दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस एक खोटे बोलतात अशी टीका देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. परमवीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डिल झाली होती, असा आरोप देखील त्यांनी केला. मागील काही दिवसांपासून चांदीवाल अहवालावरून राज्यात चांगलंच वातावरण तापले आहे. हा अहवाल जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असतानाच अहवाल सादर करण्यात आला होता, मग तो जाहीर का झाला नाही? असा प्रति प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!