---Advertisement---

प्रकाश आंबेडकरांचे विधान : शिंदेंचीच खरी शिवसेना !

By team
On: August 5, 2024 2:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सध्या राजकीय चर्चेला उधान सुरु असतांना नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्ट्राईक रेट हा आरक्षणावादी आणि मुस्लिम यांच्यामुळे वाढला असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईकरेट सरळ सरळ डबल असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मी त्यांचीच खरी शिवसेना असल्याचे मानत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.

शिवसेनेला जी मत मिळत होती ती शिवसेनेची सर्व मत एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आणि खरा शिवसैनिका एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जो स्ट्राइकरेट आलेला आहे, तो आरक्षणवादी आणि मुस्लिम यांच्यामुळे वाढला आहे. त्यामुळे तो धर्मवादी पक्षांचा मतदार नसल्याचा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे मी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!