---Advertisement---

जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी 29 व 30 सप्टेंबरला परीक्षा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.24 : शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद,सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यासाठी 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा 29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत डायनामिक कॉप्युटर्स, बँक ऑफ इंडिया, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी घेण्यात येणार आहे.

यापूर्वी रविवार दि. 25 ऑगस्ट 2019 रोजी परिक्षा निश्चित करण्यात आली होती. परंतु तात्रिक / प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. संबंधित उमेदवारांनी परीक्षेस प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे.

या परीक्षेचे प्रवेश पत्र आपणांस अर्जावर नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअपव्दारा प्राप्त होईल. ज्यांना प्रवेश पत्र प्राप्त होणार नाही अशा उमेदवारांनी 9890292961 या मोबाईल क्रमांकावर व या कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे.

परीक्षेस येताना आधार कार्ड /वाहन परवाना/मतदान ओळखपत्र यापैकी एकाची मूळ व छायांकित प्रत त्यावर आधार नंबर नमुद करुन घेवून यावा, असे सचिव, निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!