सोलापूर : वृत्तसंस्था
अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगरातील घर नंबर ६०० बी मध्ये गुरुवारी ‘माझ्या मृत्यूस आई वडीलांना जबाबदार धरू नये’, अशी सुसाइड नोट लिहून २३ वर्षीय तरुणी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रोहित भिमू ठणकेदार (वय २३, रा. शांती नगर, मड्डी वस्ती, सोलापूर) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३, रा. व्हीटीसी शिरूर, जि. बागलकोट, कर्नाटक) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. तरुणीच्या आधार कार्डवर बागलकोट, कर्नाटक येथील पत्ता आहे. मात्र ती मुलगी मुळची सोलापूरच्या शाहीर वस्ती परिसरातील आहे. रोहित वाहनचालक म्हणून काम करतो. घटना कळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहा पोलिस निरीक्षक राधिका केंद्रे, पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. एकाचवेळी गळफास का घेतला असावा, गळफास घेणारे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणचे , हे दोघे कर्णिक नगरातील घरात एकत्र कसे? अश्विनी रोहित… ‘आम्ही बहीण-भाऊ आहोत, वडील मुलगी आहे, नात्यास संशय घेऊ नये, माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये’, असे तरुणीने लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले.