ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा

आमदार सातपुते यांचा अक्कलकोट दौरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश गावांना काँग्रेसने विकास निधीही दिला नाही. स्वातंत्र्यानंतर तब्बल ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून जनतेनं वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्याही निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.

शनिवारी, भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी भाजपा व महायुतीच्याच पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला.आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बिंजगेर, संगोळगी, तळेवाड, बोरोटी खुर्द, बोरोटी बुद्रुक, बबलाद, आंदेवाडी, दुधनी येथील ग्रामस्थांशी भेटून भाजपा व महायुतीची भूमिका विषद केली.आमदार सातपुते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या वेगाने प्रगती करत आहे. देशभर विणलेले रस्त्यांचे जाळे, जल जीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा दिलेला निधी, उज्वला गॅस योजनेसारख्या माता – भगिनींसाठी उपयुक्त योजना राबविल्यामुळे देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघातही जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर, उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसर विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच काळात झाला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासह देशभरात विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे मतदारांनी देश विकासाला मतदान करावे, असे आवाहनही आमदार कल्याणशेट्टी यांनी याप्रसंगी केले.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, भाजपा अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे, अप्पू बिराजदार, अप्पू परमशेट्टी, सिद्धाराम बाके, विश्वनाथ नागुर, आयप्पा हौदे, शिवप्पा हिळ्ळी नागप्पा सिंदखेड, हुसेनी नंदीवाले, के. बी. पाटील, बसवंत कलशेट्टी, आमसिद्ध पुजारी, अंबिका निरगुडे, मधुकर पुजारी, चंद्रकांत देगाव, अप्पाराव पाटील, सुनिल जमादार आदी उपस्थित होते.

बुलेटवरून काढली मिरवणूक
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या गावभेट दौऱ्याप्रसंगी बबलाद ग्रामस्थांनी उमेदवार आमदार सातपुते आणि आमदार कल्याणशेट्टी यांची बुलेटवरून जल्लोषात मिरवणूक काढली. भाजपाचे झेंडे, जय श्रीराम च्या घोषणा, फटाक्यांची आतिषबाजी, हलगीचा कडकडाट अशा वातावरणात गावातून फेरी काढत कॉर्नर बैठक घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!