ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीस अन् आदित्य ठाकरे आमने-सामने

विधानसभेमध्ये चर्चेचा विषय

मुंबई वृत्तसंस्था 

 

आजपासून विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली जाणार आहे. सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये पूर्वतायरीची लगबग दिसून येत होती. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत दाखल होऊ लागले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपआपल्या पक्षांच्या आमदारांच्या गर्दीत विधानसभेत दाखल झाले. मात्र या साऱ्यादरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवरच अचानक उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच वरळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने-सामने आले. त्यानंतर हे काही घडलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

 

दोघे आमने-सामने आले

अधिवेशनासाठी वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवर पोहचले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच उभे होते. आदित्य ठाकरेंनी त्यांना पाहताच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मुख्यमंत्र्यांनीही हसत हसत हात पुढे केला आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केलं तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. अगदी काही सेकांदासाठी झालेली ही भेट विधानसभेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!