मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरद पवार भाषणा दरम्यान भिजले होते त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर आज देखील व्हायरल होत असतो. आता भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस देखील पावसात भिजल्याने अनेक फोटो व्हायरल होवू लागले आहे.
मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, पाऊस सुरु असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी भाषण सुरूच ठेवलं. भर पावसात त्यांनी भाषण करत 26/11 च्या शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी 26/11तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. फडणवीस भाषण करत असतानाच अचानक वरुणराजाने हजेरी लावली. भर पावसातही देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. फडणवीस यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. विशेष म्हणजे सर्वच मान्यवर या भर पावसात उभे होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करण्यात आला.