ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परिवार पाण्यात अडकले : ठाकरेंचा खासदार थेट पाण्यात उतरले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून धाराशिव जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील परंडा परिसरात पूराचे पाणी अचानक वाढल्यामुळे एका कुटुंबातील आजी आणि 2 वर्षीय नातू तसेच दोन इतर नागरिक रात्रीच्या 2 वाजल्यापासून पाण्याखाली अडकले होते. या संकटग्रस्त परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात हातभार लावला. त्यांनी एनडीआरएफ टीमसह कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले आणि संध्याकाळी 8 वाजता यशस्वीरित्या त्यांचे जीवन वाचवले.

ओमराजे निंबाळकर यांनी या घटनेची माहिती फेसबुकवर पोस्ट करून एनडीआरएफ जवानांचे आभार मानले. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामस्थांनी आणि मराठवाड्यातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतूक केले आहे. ओमराजे यांनी फक्त राजकीय दृष्टीनेच नव्हे तर मानवी दृष्ट्या आपले कर्तव्य बजावले, हे अनेकांनी म्हटले आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “राजकारणी म्हणून नव्हे तर ओमराजे तुझा मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. सध्या पावसाच्या थैमानातही तू थेट ग्राउंडवर उतरून लोकांसाठी जीव धोक्यात घालून पुण्याचे काम करत आहेस. नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे, ते एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे शिकू शकतात.”

या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते ndrf च्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले..! या कार्यात ndrf च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!