ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चाहते चिंतेत : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर !

मुंबई : वृत्तसंस्था

नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मात्र तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यानंतर चाहत्यांनीही तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सोनाली बेंद्रे विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिने नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि हलका निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली होती. तिच्या हाताला फ्रॅक्चर बँडेज लावलेले दिसले. तर दुसऱ्या हातात एक छोटी हँडबॅग घेतली होती. पापाराझींनी सोनालीला हाताबद्दल विचारल्यावर ती “गिर गई तो टूट गया” असे म्हणते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोनाली ही बॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री आहे आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  तिने 90 च्या दशकात तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली. सोनालीने 1994 च्या ‘आग’ या चित्रपटापासून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली.

सोनालीने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत सुपरहिट चित्रपट केला आहे. 1995 मध्ये सोनालीने फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला. बॉलिवूडच्या हिट अभिनेत्रींच्या यादीत सोनालीचे नाव घेतले जाते. अलिकडेच सोनाली बेंद्रे ‘द ब्रोकन न्यूज 2’ मध्ये दिसली होती.

आता लवकरच सोनाली बेंद्रेचा आगामी प्रोजेक्ट ‘द हॅपी पावडकास्ट’ लाँच होणार आहे. या पॉडकास्टचा विषय पाळीव प्राण्याचे पालकत्व आणि प्राण्यांची काळजी आहे. ‘द हॅपी पावडकास्ट’ हा शो 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!