ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिमुकलीसमोरच बापाने केला आईचा खून : सोलापूर हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३१ वर्षीय युवराज लक्ष्मण शेरे  याने पत्नी रूपाली युवराज शेरे (वय 25) हिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना त्यांच्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीसमोरच घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. तो सतत पत्नीशी वाद घालत असे आणि कुटुंबीयांशीही नीट संवाद करत नव्हता. मागील दोन महिन्यांपासून त्याचे वागणे बदलले होते. या मानसिक तणावातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या दुर्दैवी घटनेवेळी त्यांची साडेचार महिन्यांची चिमुकली देखील घरात उपस्थित होती. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, युवराज शेरे हा पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय व लहान मुलीसह कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होता. युवराज शेरे व त्यांची पत्नी रूपाली दोघेच घरी असताना युवराजने रूपालीचा गळा दाबून खून केला. आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर युवराजला पश्चाताप झाला व त्यातून त्याने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तसेच घरातील इतर सदस्य सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी घरात साडेचार वर्षांची चिमुकलीच्या रडण्याचा आवाज घरातून येत असल्याचे ऐकू आले. तेव्हा तेव्हा युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना घरातील दृश्य पाहून धक्काच बसला. सून रूपाली मृत अवस्थेत पडली होती तर मुलगा युवराज लोखंडी अँगलला लटकलेला दिसल्यावर वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी युवराजला खाली उतरवले आणि या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group