ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एका निर्णयाने सर्व ग्रामीण भागातल्या वस्त्या पुन्हा अंधारात जाण्याची भीती; मंजूर झालेले हायमास्ट दिवे बसवा संजय मामा शिंदे यांची मागणी

करमाळा : राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवीन हायमास्ट दिवे बसू नये, असे आदेश पारित झाले असून मात्र 8 डिसेंबर 2021 पर्यंत मंजूर झालेले हाय मास्टदिवे बसवावेत, अशी मागणी आमदार संजय मामा शिंदे यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

करमाळा तालुक्यातील जवळपास 70 गावात चालू आर्थिक वर्षात 80 लाख रूपये किंमतीच्या हायमास्ट दिवे मंजूर झालेले आहेत.  या दिव्यांच्या मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  असे असताना अचानक मंजूर झालेले हायमास्ट दिवे रद्द करणे चुकीचे ठरत आहे.  त्यामुळे शासनाने 8 डिसेंबर पूर्वी मंजूर झालेले सर्व दिवे बसवण्यासाठी सुधारित अध्यादेश काढावा,  अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील असून वर्षानुवर्षे वाड्या वस्तीवर राहणारे ग्रामीण भागातले लोक अंधारात राहत आहेत.  त्यांच्या वस्त्या प्रकाशमान करण्याची वेळ आलेली असताना एका निर्णयाने सर्व ग्रामीण भागातल्या वस्त्या पुन्हा अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.  यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा विचार करून निदान मंजूर झालेल्या व निधी वर्ग झालेल्या कामांना या नवीन अध्यादेशात वगळून नवीन अध्यादेश काढावा,  अशी मागणी आमदार संजय मामा शिंदे शिंदे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!