ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चक्रीवादाळाचा तडाखा.. सोलापुरात पावसाचा इशारा

पुणे वृत्तसंस्था 

 

गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढला होता.त्यातच  फेंगलचा पश्चिम बंगालसह हिंद महासागरात जोर वाढला असून फेंगल चक्रीवादळ आता दक्षिणेसह श्रीलंकेकडे वळाल आहे. त्याचा परिणाम किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातही दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

गेल्या काही दिवसात चांगलाच गारठा आला होता. राज्यात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. थंड हवेच्या ठिकाणापेक्षा राज्यातील अनेक भागात तापमानात कमाल घसरण झाली होती. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. पण राज्यातील काही जिल्ह्यांना फेंगल चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, तामिळनाडूत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात दमटपणा वाढलेला आहे. दुपारी उकाडा जाणवत आहे. राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर नांदेडसह काही जिल्ह्यात आणि कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!